आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारांचा गुंता:जिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा; खरेदी करावे लागतात महागडी औषधी

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभराच्या जिल्हा रूग्णालयात औषधींचा तुटवडा भासत आहे. नंदुरबार जिल्हा रूग्णालय देखील त्याला अपवाद नाही. साधारण एचआयव्ही, फ्लूडस, लहान बाळांचे औषध तसेच औषधी साहित्यांचा वाणवा आहे. प्रतिजैविक इंजेक्शन, सर्पदंशावरील औषधे, मानसिक रूग्णांकरीता लागणारे औषधी, शस्त्रक्रीयेवरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे रुग्णांना बाहेरून औषधी घेऊन उपचार करून घ्यावे लागत आहे. तर सोमवारपासून औषधी खरेदी होणार, असा दावा आरोग्य प्रशासनाने केला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासत असून गेल्या एप्रिल महिन्यापासून या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्हा नियोजनकडून मिळणाऱ्या निधीच्या दहा टक्के निधीतून औषध खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. टेंडर देखील मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारपासून औषध खरेदी प्रक्रियेला गती येण्याची शक्यता आहे, असा दावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारूदत्त शिंदे यांनी केला आहे. नंदुरबार जिल्ह्यात नर्मदा काठावर सर्प दंशाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सरपंदंशावरील औषधे उपलब्ध हवेत. नंदुरबार हा आकांक्षित जिल्ह्यात मोडतो. त्यामुळे औषधाच्या बाबतीत राज्यशासनाने गंभीर असायला हवे. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी कुटुंब बाहेरील महागडी औषधी खरेदी करू शकत नाही. आदिवासी विकास मंत्र्यांनी आपला निधी औषधींसाठी पुरवला तरी औषधांचा तुटवडा भासणार नाही. सर्पदंशाच्या औषधांचा पुरवठा एक ते दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.

पुरेशी औषधी मिळावी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात रुग्ण उपचार घेतात. अनेकांकडे भाड्याला पैसे नसतात, असे रुग्ण बाहेरून औषध कसे खरेदी करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तळोदा, धडगाव, अक्कलकुवा या दुर्गम भागात असलेल्या ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्रातून रेफेर केलेले रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. त्यांना पुरेसे औषधी दिली गेली पाहिजे,असे रुग्णाने सांगितले.

काही औषधांचा अल्पसाठा सर्वच साठा संपलेला नाही. काही औषधांचा अल्पसाठा आहे. तर काही औषधी संपलेल्या आहेत. टेंडर प्रोसेस झाली आहे. सोमवारनंतर औषधांचा तुटवडा राहणार नाही. औषधांचा अल्पसाठा असतांना साठाच शिल्लक नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. जी औषधी संपली आहेत, त्याला पर्याय औषधी असतात. डॉ. चारूदत्त शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार

बातम्या आणखी आहेत...