आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातळोदा नगर पालिकेच्या माध्यमातून जाहीर सूचना चुकीची दिल्याप्रकरणी तळोदा नगर परिषदच्या मुख्यधिकारी सपना वसावा यांना कारणे दाखवा नोटीस बजवण्यात आली असून 24 तासांत उत्तर मागितले आहे. दरम्यान याच पडसाद पालिकेत उमटले असून मुख्यधिकारी सपना वसावा यांनी पालिकेचे कर निरीक्षक राजेश बन्सी पाडवी यांना नोटीस देत 24 तासांत उत्तर मागितले आहे,
काय आहे प्रकरण ?
काल तळोदा पालिकेचे चुकीचे पत्रक व रिक्षाद्वारे चुकीची माहिती जनतेत प्रसारित केली गेली. यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी संध्याकाळी याबाबत खुलासा करून जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेप्रमाणे शहरातील व्यवहार सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. प्रतिबंधित क्षेत्रातील काही दुकान व व्यवसाय सोडून इतर सर्व दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काल दिले होते. याबाबत नगर परिषदेने नागरिकांना माहिती देण्यासाठी पत्रक काढण्यात आले व शहरात रिक्षा फिरवून लाऊडस्पीकरद्वारे माहिती देण्यात आली. परंतु या पत्रकामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना व पालिकेने दिलेल्या सूचना यांत मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचे दिसून आहे.
पालिकेने काढलेल्या पत्रकात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा उल्लेख करीत शहरातील वैद्यकीय सेवा, मेडिकल, भाजीपाला, किराणा व दूध विक्रेते वगळून सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद राहतील. सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत बंद राहील याची नोंद घ्यावी, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार भारतीय दंड संहिता कलम 88 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नमूद केले आहे. याच आशयाची माहिती नागरिंकाना देण्यासाठी पालिकेच्या वतीने गावांतून रिक्षा देखील फिरविण्यात आली.
एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रकारची दुकाने सकाळी आठ ते बारा दरम्यान सुरू राहतील असे आदेश दिले असतांना पालिकेने काढलेल्र्या पत्रकात वैद्यकीय सेवा, मेडिकल, भाजीपाला, किराणा व दूध विक्रेते वगळून सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याचे नमूद केल्याने व रिक्षा फिरवून नागरिकांमध्ये तसा संदेश प्रसारित गेल्याने दुकानदारांसह नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रवस्था निर्माण झाली होती. याची दखल घेत उपविभागीय अधिकारी अविशंत पांडा यांनी मुख्यधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.