आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दे धक्का:तळोद्यात नादुरुस्त बसला दे धक्का; स्मारक चौकात झाली वाहतुकीची कोंडी

तळोदा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकुवा आगाराच्या बसेस भंगार झालेले असून याचाच प्रत्यय तळोदा येथील स्मारक चौकात आला. सोमवारी सकाळी ११ वाजता नंदुरबार मार्गे तळोदा येणारी बस ही भर चौकात बंद पडल्याने प्रवाशांना खाली उतरून पायी जावे लागले. वाहन चालक व वाहक यांनी प्रवास यांच्या माध्यमातून वाहनाला धक्का मारून सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र बस सुरू न झाल्यामुळे त्यांनी देखील नाद सोडला, मात्र ११ ते ३ वाजे दरम्यान वाहतूक कोंडी झाली.

खराब रस्ते, त्यात नादुरुस्त बसेस अक्कक्कुवा आगारात आहेत. मागील सात वर्षात एकही नवीन बस न दिल्याने खिळखिळ झालेल्या बसेस रस्त्यावर धावताना दिसत आहे. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोमवारी बंद पडलेली बस नागरिकांचा मदतीने चालकाने धक्का देवून पुढे काढली. तीन वाजेच्या सुमारास मेकॅनिकल आले. मात्र तरीही बस सुरू न झाल्याने बसला दे धक्का देत न्यावी लागली.

नवीन बसेस मिळणे गरजेचे : अक्कलकुवा आगाराकडे ६९ गाड्या असून त्यापैकी १६ बसेस या मानवविकासच्या असून ३ मिनी बसेस आहेत. ६९ बसेस पैकी १३ बसेस या १० लाख किलोमीटरपेक्षा अधिक धावल्या असून कालबाह्य होण्याचा मार्गावर आहेत. जिल्ह्यासाठी नवीन बसेसची मागणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...