आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनचा असाही फायदा:78 तलावांतून गाळ काढला, नवापूर तालुका पाणीदार; 112 टीएमसी पाणीसाठा

नीलेश पाटील | नवापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 19,121 कुटुंबांतील 31,573 मजुरांच्या हाताला काम मिळाले

लॉकडाऊनचा काळ अनेकांसाठी त्रासदायक ठरला. मात्र हाच लॉकडाऊन नवापूर (जि. नंदुरबार) तालुक्यासाठी वरदान ठरला. या काळात मजुरांच्या हाताला रोजगार मिळावा या उद्देशाने ७८ तलावांतील गाळ काढण्यात आला. त्यामुळे संपूर्ण तालुका पाणीदार झाला असून ११२ टीएमसी जलसाठा निर्माण आहे. त्याचे फलित म्हणजे चौपट पाणी जमिनीत मुरले. यामुळे विहिरी तुडुंब भरल्या आहेत.

असा झाला सकारात्मक परिणाम...

> १९,१२१ कुटुंबांतील ३१,५७३ मजुरांच्या हाताला काम मिळाले

> ९.२२ कोटी रुपये तालुकास्तरावर मजुरीतून उपलब्ध झाले. काही कुटुंबांनी तर २० ते २५ हजार मजुरी घेतली.

> १९ हजार कुटुंबांत ३१ हजार लोकांच्या खात्यात पैसा जमा झाल्याने लोकांची क्रयशक्ती वाढली.

> भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. शेतजमिनींवर गाळ पसरवून सुपीकता आणि उत्पादकता वाढवली. मोटारविनाच बोअरवेलमधून पाणी येऊ लागले. विहिरी तुडुंब भरल्या.

बातम्या आणखी आहेत...