आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सोशल मीडिया अत्यंत घातक, काळजी घ्या; आमदार राजेश पाडवींचे आवाहन

तळोदा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइलवर आलेल्या मेसेजेस हे काही बाहेरचे समाजकंटक टाकतात. त्याबाबत हिंदू-मुस्लिम समाज बांधवांनी त्या संदर्भात सत्य-असत्य काय आहे हे आधी समजून घ्यावे व मग आपापल्या समाजात त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करावे, असे आवाहन मंगळवारी सायंकाळी सहा वाजता येथील पोलिस ठाण्यातर्फे बोलावलेल्या शांतता समितीच्या बैठकीत आमदार राजेश पाडवी यांनी केले. त्यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली.

यावेळी सोशल मीडियावर आलेल्या मेसेजेसवरून अक्कलकुवा येथे झालेल्या नासधूसबाबत आमदार पाडवींनी सांगितले की, अक्कलकुवा सारखी घटना आपल्या गावात घडणार नाही, याची खबरदारी घ्या. काही समाजकंटकांमुळे घटना घडल्यावर निरपराध लोकांचे नुकसान होते. पोलिस आपले कर्तव्य करतात. ते सर्व ठिकाणी पोहोचतील असे नाही तर शांतता समितीच्या सदस्यांनी हे आपलेही कर्तव्य असल्याचे समजून समाजात शांतता कशी राहील, याचे मार्गदर्शन करावे, असे सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्ष अजय परदेशी म्हणाले की, आताच आपण कोराेना महामारीतून सावरत आहोत. शहरात सर्व समाजबांधव एकोप्याने राहतात. त्यांच्यात कुठलाच वाद नाही. अक्कलकुवा येथे घडलेला प्रकार निंदनीय आहे. असा प्रकार येथे होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. याप्रसंगी तहसीलदार गिरीश वखारे, पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा, कैलास चौधरी, निसार मक्राणी, विजय सोनवणे, केसरसिंह क्षत्रिय, जालंदर भोई आदींनी शांतता समितीचा बैठकीत मार्गदर्शन केले.

यावेळी पोलिस पाटील बापू नारायण पाटील, डॉ. शांतिलाल पिंपरे, नगरसेवक अमानोद्दीन शेख, राजाराम राणे, दीपक चौधरी, किरण सूर्यवंशी, तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कालिचरण सूर्यवंशी, मुस्लिम समाज अध्यक्ष शेख आरिफ नुरा, सादिक सय्यद, युनूस अन्सारी, मुन्ना कुरेशी, अमीन पिंजारी, अनिल परदेशी, पत्रकार बांधव, शांतता समितीचे सदस्य आदि उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...