आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणगाैरव:वार्षिक समारंभात समाजबांधवांचा सन्मान; लाडशाखीय वाणी समाजबांधवांचा राेख बक्षिसे देण्यासाठी पुढाकार

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील लाडशाखीय वाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम दंडपाणेश्वर गणपती मंदिर येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे महानगरपालिकेचे उपमहापौर अनिल नागमोते तर प्रमुख पाहुणे म्हणून नारायणी हॉस्पिटल नाशिकचे संचालक डॉ.पंकज राणे, भारतीय जीवन विमा महामंडळ भोसरी पुणेचे शाखाधिकारी प्रवीण अमृतकर व निजामपूर गणाचे पंचायत समिती सदस्य सतीश वाणी उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत समाज बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ईशस्तवन व स्वागत गीत जयश्री देव यांनी सादर केले. पाहुण्यांचा परिचय नितीन पाटील यांनी करून दिला. प्रास्ताविक वाणी समाजाचे येथील अध्यक्ष प्रमोद भदाणे यांनी केले. यावेळी ज्युनिअर केजीपासून पदव्युत्तर परीक्षांपर्यंत उत्तुंग यश प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांना राेख बक्षिसे
या कार्यक्रमाप्रसंगी समाजबांधव रामदास कोतकर, हरी येवला, मुरलीधर वाणी, सुनील धामणे, विजय येवले, पंढरीनाथ मेखे, मनोज देव, श्यामकांत पाटकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना वैयक्तिक रोख रकमेच्या बक्षिसाचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थी भारावले. तसेच यामुळे आम्हाला अधिक अभ्यास करून यश मिळवण्याची प्रेरणा लाभल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.राणे, अमृतकर यांनीही मार्गदर्शन केले. उपमहापौर नागमोते यांनी विद्यार्थ्यांची प्रगती उल्लेखनीय असून, त्यात त्यांच्या पालकांचाही माेठा व महत्त्वपूर्ण सहभाग असल्याचे नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद चिंचोले यांनी केले तर आभार सचिव गणेश चांदवडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपाध्यक्ष सुनील धामणे, सूर्यकांत दशपुते, मनोज देव, अनिल मालपुरे, मंगेश नेरकर, नितीन पाटील यांनी परिश्रम घेतले.

सेवानिवृत्त, पदाेन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांचाही सत्कार
सेवेतून निवृत्त झालेले, पदोन्नती मिळालेले व विविध पदांवर निवड झालेले कर्मचारी, नवविवाहित दाम्पत्य या सर्वांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्ह्यातील नंदुरबार, खांडबारा, चिंचपाडा, तळोदा येथील समाजबांधव सपत्नीक उपस्थित होते. यावेळी समाजधुरिणांनी उपस्थित समाज बांधवांना विविध मुद्द्यांवर मार्गदर्शनही केले.

बातम्या आणखी आहेत...