आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:प्रतापपूर येथे कृषिदूतांतर्फे माती परीक्षण कार्यक्रम

बोरद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबार ग्रामीण यांच्या कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील कृषिदूतांतर्फे प्रतापपूर येथे माती परीक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते.

शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणासंबंधी जनजागृती व्हावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी, रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर ३ महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करावे, असा सल्ला कृषिदूतांनी शेतकऱ्यांना दिला. याबरोबरच शेतातील मातीचे नमुने गोळा करून त्याचे परीक्षण करण्यात आले. मातीमध्ये असणारे घटक, जमिनीचा सामू, मातीचा प्रकार व माती परीक्षणाचे फायदे याविषयी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्यात आले. या वेळी कृषिदूत आकाश पवार, विजय गावित, राहुल साबळे, सौरभ गावित, नितीन दुबे यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस.बी. खरबडे, चेअरमन डॉ. एस.यू. बोराळे कार्यक्रम अधिकारी डॉ. ए. टी. लोखंडे, विषयतज्ज्ञ डॉ. एन. आर सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...