आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:शासकीय वसतिगृहातील समस्या तत्काळ मार्गी लावा; शहाद्यात संतप्त विद्यार्थ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन

शहादा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नवीन तहसील कार्यालयाजवळ असलेल्या आदिवासी विभाग संचलित शासकीय मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थी अनेक समस्यांनी त्रस्त झाले असून, वसतिगृहातील अधीक्षक मद्यप्राशन करून शिवीगाळ करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. वसतिगृहातील समस्या तत्काळ सोडाव्या तसेच अधीक्षकांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे तहसीलदारांना देण्यात आले. विद्यार्थ्यांचे निवेदन नायब तहसीलदारांनी स्वीकारले.

वसतिगृहातील सर्व विद्यार्थी व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते तहसील कचेरीच्या आवारात ठाण मांडून बसले होते. अधीक्षकांचा मनमानी कारभाराच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. शेवटी नायब तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारून चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले. समस्या सुटल्या नाहीत तर २३ जूनपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिल्हाभर आंदोलन करेल, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते स्वरूप लुंकड व विद्यार्थ्यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...