आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:शहरातील बेशिस्त वाहतूक, हातगाड्यांचे अतिक्रमण, मोकाट गुरांचा प्रश्न सोडवा; निवेदनाद्वारे केली प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बेशिस्त वाहतूक, रहदारीचा प्रश्न तसेच मोकाट गुरांच्या प्रश्नाबाबत प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांना निवेदन देऊन हे प्रश्न तत्काळ साेडवण्याची मागणी करण्यात आली.

शहरात रहदारीचा प्रश्न हा कायमचा भेडसावतो आहे. मुख्य रस्त्यांच्या बाजूला बेशिस्त वाहने लावली जातात. ती शिस्तीत लावली गेली पाहिजेत. हातगाडीधारक रस्त्यालगत व्यवसाय करतात. अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पोलिस प्रशासनाने वाहतुकीबाबत कठोर भूमिका घेण्याची मागणी केली. प्रांत डॉ.गिरासे यांनी कारवाईबाबत आश्वासन दिले. यावेळी माजी नगरसेवक लोटन धोबी, अजय शर्मा, प्रा.लियाकत अली सय्यद, नीलेश मराठे, पिनाक पाटील, विष्णू जोंधळे, बनेचंद जैन, डी.जी.पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...