आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उचीशेवडी येथील आठ जणांच्या विरोधात गुन्हा:नुकसानीची भरपाई मागितली; पती-पत्नीस मारहाण

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर तालुक्यातील उचीशेवडी गावात वाहनाचे नुकसान केल्याच्या कारणावरून नुकसान भरपाई मागितल्याचा राग येऊन पती-पत्नीला काठीने मारहाण केल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाभरासाठी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उचीशेवडी येथील आठ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

स्वप्निल गावित याने ५ मे २०२०२ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास इको वाहन हे रोडच्या खाली उतरवून वाहनाचे नुकसान केले. याबाबत प्रभू होड्या गावित याने स्वप्निल गावित याच्याकडून वाहनाच्या झालेल्या नुकसानीची भरपाईची रक्कम मागितली. याचा राग येऊन स्वप्निल गावित, सुमन गावित, मोतीराम गावित, रतीलाल गावित, अजू गावित, कांतिलाल गावित, दावित सेवा गावित, हरी जतू गावित या आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जमावाने काठीने पती-पत्नीस मारहाण केली. त्यात प्रभू व त्याची पत्नी सुनीता गावित दोन्ही जखमी झाले आहे. तपास असई दिलीप गावित करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...