आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा पावसाळा अनेक दिवस लांबला. परतीच्या पावसानंतर रब्बी पिकांची लागवड सुरू झाली. सध्या रब्बी पिकांच्या मशागतीची कामे सुरू झाली असून, पेरणीही सुरू झाली आहेत. आज अखेर सहा हजार हेक्टर शेतावर रब्बीची लागवड झाली आहे. अद्याप दहा टक्केच पेरण्या झाल्या असून उर्वरित पेरण्या लवकरच होतील. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट यायचे आहेत. नंदुरबार जिल्ह्यात ६२ हजार ९७४.९० हेक्टर पिकांचे क्षेत्र आहे.
गहू, हरभरा, मका, ज्वारी या रब्बी पिकांची पावसाळा संपल्यावर लागवड केली जाते. यंदा पाऊस चांगलाच लांबला. तर आतापर्यंत ज्वारी १ हजार हेक्टर, गहू १३८ हेक्टर, मका २१० हेक्टर ,हरभरा ५१३ हेक्टर या पिकांची लागवड झाली आहे. एकूण ६ हजार हेक्टर पिकांची लागवड झाली असून, त्याची नोंद व्हायची बाकी आहे. त्यामुळे सरासरी दहा टक्के रब्बी पिकांची लागवड झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मूग, उडीदची काढणी पूर्ण झाली. सोयाबीन, बाजरी, मका, भात व ज्वारी या पिकांची काढणी सुरू आहे. या पिकांची काढणी पूर्ण झाल्यानंतर रब्बी पिकांकडे शेतकरी अधिक वळतील, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
जमिनीची भिज चांगली असल्याने फायदा
जिल्ह्यात खरीप पिकांची दाेन लाख ७७ हजार ५९६ हेक्टरवर पिकांची पेरणी झाली. तसेच यंदा बहुतांश लघू व मध्यम प्रकल्प भरली आहेत. जमिनीची भिज चांगली आहे. त्यामुळे रब्बीचे पीक अधिक येण्याची शक्यता आहे. खरीप क्षेत्रात ऊस, मिरची व कापूस ही पिके निघाली. यंदा उशिराने रब्बीची लागवड होत आहे.
सरासरी ८८.१ % पाऊस : जिल्ह्यात ७५७.६ मिमी पाऊस असून,जवळपास ८८.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात धडगाव तालुक्यात ९४५.९ मिमी,तर अक्कलकुवा १०३५.८ मिमी पाऊस पडला.धडगावात १०७.९ टक्के तर अक्कलकुवामध्ये १०१.५ टक्के पाऊस झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.