आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:विवाहितेचा छळ; आठ जणांच्या विरोधात गुन्हा

नंदुरबार4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवाहित महिलेचा सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने सासरच्या मंडळींच्या विरोधात नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वंदना दिलीप अहिरे या ईश्वर कॉलनी येथे राहणाऱ्या विवाहितेने फिर्याद दिली आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिलीप भिका अहिरे, मीना भिका अहिरे, राजेश भिका अहिरे, शोभा लोटन शिरसाठ, वंदना मुकुंद शिरसाठ, प्रमिला तुकाराम माळी, कमल दादाभाई गवळे आदींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती दिलीप अहिरे यांने दारा खिडक्यांना हाता बुक्क्यांनी मारून स्वयंपाकाचे साहित्य कपाटाला मारून फेकले. यानंतर महिलेने उपनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. सखू गावित यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...