आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगता:श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात अखंड  नाम यज्ञ सप्ताहाची आज भक्तिमय वातावरणात सांगता

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दत्त जयंतीनिमित्त येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहानिमित्त गुरुचरित्र पारायण वाचन करण्यात आले. शहरातील नेहरू चौक येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व चौपाळे रोड येथील स्वामी समर्थ प्रशिक्षण केंद्र येथे मिळून जवळपास ५०० च्या वर सेवेकरी गुरुचरित्र पारायणास बसले हाेते.

या सप्ताह कालावधीत नित्य स्वाहाकार सोबत गणेश याग, गीताई याग, स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग, चंडी याग असे विविध याग संपन्न झाले. २४ तास प्रहराची सेवा चालली. बुधवारी दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला. गुरुवारी सत्यदत्त पूजनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. सेवेकरांनी या सप्ताह काळात जास्तीत जास्त परिश्रम करून स्वामी समर्थांच्या चरणी सेवा रुजू करावी, असे आवाहन स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने सर्व भाविकांना करण्यात आले हाेते.

बातम्या आणखी आहेत...