आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासादायक:शिक्षण विभागात योजना कार्यालयास सुरुवात; 38 योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध

नंदुरबार23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभागात स्वतंत्र योजना कार्यालय कार्यान्वित झाले असून, या कार्यालयामुळे विद्यार्थ्यांना वेळेत योजनांचा लाभ मिळू शकणार आहे. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांची संख्या दोनवरून तीनवर पोहोचणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात एकूण ३८ योजना कार्यान्वित झाल्या असून यात केंद्र शासनाच्या दोन नव्या योजनांचा समावेश आहे.

शिक्षण विभागातील सहा कर्मचारी व अधिकाऱ्यांना योजनांचे वाटप करण्यात आले आहे. यात उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण : सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना, महेंद्र अहिरे : प्राथमिक शाळेतील पुस्तक पेढी योजना, वरिष्ठ सहायक लेखा की.बी. बडगुजर : जि.प.प्राथमिक शाळांतील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष सुविधा मोफत गणवेश व साहित्य पुरवठा, इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या मोफत गणवेश व लेखन साहित्य पुरवठा, मुलींना उपस्थिती भत्ता, गणेश पाटील : शालेय पोषण आहार योजना, उपशिक्षणाधिकारी सी. डी. पाटील : माजी सैनिकंाच्या मुलांना शैक्षणिक सवलत, माध्यमिक पुस्तक पेढी योजना, आदिवासी विद्यार्थ्यांना विद्या वेतन, प्राथमिक शाळांमधील शिष्यवृत्ती, ग्रामीण भागातील हुशार प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती, भाषा विकास संस्कृत शिक्षण माध्यमिक शाळांमध्ये भारत सरकारची शिष्यवृत्ती, उपशिक्षणाधिकारी आर. बी. पाटील :आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, कनिष्ठ महाविद्यालयातील खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, बारावीच्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, शिक्षण शास्त्र पदविकास पाठ्यक्रमातील मुलींना मोफत शिक्षण, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांच्या मुलांना शैक्षणिक सवलत, प्राथमिक शिक्षण विभागात ९ योजनांचा समावेश असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागात जवळपास २९ योजनांचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या नवीन दोन योजना सुरू झाल्या आहेत. त्यात बेगम हजरत महल शिष्यवृत्ती योजना व नवभारत साक्षर कार्यक्रमाचा समावेश असून, ही जबाबदारी उपशिक्षणाधिकारी सी. डी. पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

यांच्यावर पुन्हा अल्पसंख्याक मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना, अल्पसंख्याक समाजाच्या संस्था, शाळांसाठी पायाभूत विकास योजना, मदरशांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण, मराठी भाषा फाउंडेशन योजना या योजनांचीही जबाबदारी देण्यात आली आहे. उपशिक्षणाधिकारी सी. डी. पाटील, आर. बी. पाटील यांच्यावर अधिक योजनांचा भार सोपवण्यात आला आहे. तसेच योजना कार्यालयाच्या शिक्षणाधिकारीपदी डॉ. एम. व्ही. कदम यांची नियुक्ती करण्यात आली असून, उपशिक्षणाधिकारी म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडे धुरा सोपवण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी निरंतर कार्यालय धुळ्याला होते. निरंतर कार्यालयाच्या योजनांचाही योजना कार्यालयात समावेश करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उपलब्ध कर्मचारी, अधिकाऱ्यांकडे सोपवल्या योजना
जिल्हा परिषदेत २० ऑगस्टपासून सदर योजना कार्यालय कार्यान्वित केली आहे.प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडील योजना वर्ग केलेल्या आहेत. कार्यान्वित केलेल्या योजना कार्यालयास कामकाज करण्यासाठी अधिकारी कर्मचारी उपलब्ध नसल्याने जवळपास ३८ याेजनांचे सद्यःस्थितीत कामकाज पाहणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विषय दिले आहेत.

लवकरच इमारतीची व्यवस्था होणार
शिक्षणाधिकारी योजना कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र इमारतीची व्यवस्था लवकरच केली जाणार आहे. येथूनच या योजनांचा कारभार केला जाईल. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे. योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
डॉ. एम. व्ही. कदम, शिक्षणाधिकारी, योजना कार्यालय, नंदुरबार

बातम्या आणखी आहेत...