आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कुंभार समाजाच्या जनगणनेला प्रारंभ; नंदुरबार जिल्हा कुंभार समाज संघटनेतर्फे अभियानाचा शुभारंभ

खापर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार जिल्हा कुंभार समाज संघटनेतर्फे जिल्ह्यातील सर्वशाखीय कुंभार समाज बांधवांच्या जनगणनेस खापर येथून पंच मंडळाचे चेअरमन कांतिलाल सुकलाल प्रजापती यांचा प्रथम फॉर्म भरून सुरुवात करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य कुंभार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश दरेकर व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणेला सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सदस्य जगन्नाथ सोमा कुंभार होते. प्रमुख अतिथी म्हणून कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष हृदयेश चव्हाण, पंच मंडळाचे अध्यक्ष कांतीलाल प्रजापती, जिल्हा सल्लागार व कोषाध्यक्ष रमणलाल प्रजापती, जिल्हा उपाध्यक्ष छोटूलाल प्रजापती, आनंदा प्रजापती, पंच मंडळाचे सचिव रोहिदास कुंभार, मनोज प्रजापती, रवींद्र प्रजापती उपस्थित होते. राज्याची जनगणना केल्याने जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे, तालुक्याची लोकसंख्या किती आहे, आपल्या शहराची लोकसंख्या किती आहे. या सर्वांचे आकलन होणार आहे. म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक समाज बांधवांनी जनगणनेच्या फॉर्म संघटनेच्या जिल्हा किंवा तालुका पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून भरून घ्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष हृदयेश चव्हाण, कार्याध्यक्ष भगवान कुंभार, सचिव प्रा. बाळकृष्ण मोरे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...