आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने निवासी उप जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी निवेदन सादर करत साकडे घातले.
चटोपाध्याय वेतन श्रेणीत उर्वरित शिक्षकांचे प्रस्ताव निकाली काढा, ७ वा वेतन आयोगाच्या फरकाचा तिसरा हप्ता तालुकास्तरावर वितरीत करा, आपसी आंतरजिल्हा बदलीने जि.प.त आलेल्या शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेबाबत, प्रलंबित मेडिकल फाईल निकाली काढावी, वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयके मंजूर झालेल्या शिक्षकांना रक्कम अदा करा, अनेक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या स्थायित्व प्रमाणपत्र प्रलंबित असून त्यांच्या तत्काळ फाईल बनवा, प्राथमिक शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता यादीत बऱ्याच शिक्षक बांधवांच्या नावे क्रमवारी त्रुटी असून ती यादी दुरुस्ती करुन पुन्हा नूतनीकरण करुन प्रसिद्ध कराव्या, या शिक्षक संवर्गावर अन्याय झाला आहे याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करुन यादी दुरुस्ती करावी, सन २०१० च्या बॅचमधील शिक्षक बांधवांचे वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव मागवून तत्काळ निकाली काढणे, भविष्य निर्वाह निधी खात्यावरील रक्कम उचलण्यासाठी बंद असलेली बी.डी.एस.प्रणाली पुन्हा सुरू करावी, नवापूर तालुक्यातील माहे नोव्हेंबर २०२२ च्या वेतनासाठी पूर्ण तरतूद करणे, आदी मागण्या नमूद केल्या आहेत. त्यावर विचार करुन त्या मार्गी लावाव्यात.जि.प. उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन सहकार्य करेल असे आश्वासन दिले. अन्यथा प्रहार शिक्षक संघटना धरणे आंदोलन करेल, असा इशाराा दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.