आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्ष स्वागताचा अभिनव उपक्रम:सूर्यनमस्कार घालून विद्यार्थ्यांचेे नववर्षाला वंदन

नंदुरबार25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्षाची आव्हाने पेलण्याची एक नवी उमेद साऱ्यांना लाभावी, या उद्देशाने दरवर्षी नूतन वर्ष आरंभाला सूर्यनमस्कार घालून नववर्ष स्वागताचा अभिनव उपक्रम येथील श्रीमती हि.गो. श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राबवला. सकारात्मक संस्कारांची रेलचेल व्यक्तिमत्वामध्ये बनवली पाहिजे या उद्देशाने श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत सूर्यनमस्काराने करण्याची प्रथा रुजवली आहे.

या बहुपयोगी उपक्रमाला भाऊसाहेब थोरात, विभागीय क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, चेअरमन ॲड.रमणलाल शाह, चार्टर्ड अकाउंटंट पार्थ देसाई, सचिव डॉ.योगेश देसाई, मुख्याध्यापक सुषमा शाह, मनीष शाह, मुख्याध्यापक पूनम गिरी, उपमुख्याध्यापक राजेश शाह आदी उपस्थित होते.

श्राॅफ विद्यालयाने राबवला उपक्रम; ६०० विद्यार्थ्यांनी घातले सूर्यनमस्कार सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी शालेय मैदानावर सूर्यनमस्कार घालून पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यकिरणांना प्रणाम केले. आपल्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक सौ.सुषमा शाह यांनी मन व शरीराला सुदृढ करणारा हा सर्वांग सुंदर व्यायाम राबवण्याचा उद्देश प्रकट केला. कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी सुनंदा पाटील यांनी उपक्रमाला शुभेच्छा देत सूर्यनमस्कार आपल्या आरोग्यासाठी आवश्यक व उपयुक्त असल्याचे सांगितले. तहसीलदार थोरात यांनी आपल्या मनोगतातून शाळेने चांगला पायाला पाडल्याचे सांगीतले. या नूतन वर्षात आरोग्यमय समाजजीवन निर्माण होण्याची त्यांनी सद्भावना प्रकट केली. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी संगीत शिक्षिका अनघा जोशी, मैदान आरेखनासाठी हेमंत पाटील, दिनेश ओझा, शिवाजी माळी, फलक लेखनासाठी महेंद्र सोमवंशी यांनी परिश्रम घेतले. संस्कृत सूर्य श्लोक योगेश शास्त्री यांनी गायले. सूर्यनमस्कार संचालन, सूत्रसंचालन हेमंत पाटील तर आभार उपमुख्याध्यापक शाह यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...