आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद:कोठार आश्रमशाळेत ढोलाच्या तालावर विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी घेतला ठेका

तळोदा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोठार येथील श्री साईनाथ शिक्षण संस्था संचलित अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत पहिल्या दिवशी पारंपरिक आदिवासी ढोल वाद्य वाजवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या ढोलांच्या तालावर विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षकांनी ठेका धरल्याने वातावरणात चांगलाच उत्साह संचारला.

प्रमुख पाहुणे म्हणून तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे उपस्थित होते. आरंभी प्राथमिकचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, माध्यमिकचे मुख्याध्यापक सी.एम. पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व बिस्किटाच्या पुड्यांचे वाटप करून स्वागत केले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकेही वितरित करण्यात आली. कार्यक्रमासाठी मनोज चिंचोले, जयेश कोळी, महेश वायकर, निंबा रावडे, योगेश चव्हाण, जयवंत मराठे, शंकर मुठाळ, शालिग्राम वाणी, पन्नालाल पावरा, अजय पवार, नीता बडगुजर, कविता पावरा, अधीक्षक संदीप पाठक, अधीक्षिका अनिता पावरा, कीर्तीकुमार वाणी यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन हरी भारती यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...