आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील श्रीमती प्यारीबाई ओसवाल विद्यामंदिरात नवागतांचे अतिशय उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. माजी विद्यार्थिनी व प्राथमिक शिक्षिका मोहिनी सोनवणे, शालेय समिती सदस्य मंजूबेन जैन, पालक प्रतिनिधी संदीप वसईकर, माजी मुख्याध्यापिका सुनीता साबळे, सिव्हिल इंजिनिअर जितेंद्र गिरासे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राहुल मोरे उपस्थित होते. प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे यांनी शब्दसुमनांनी स्वागत केले. प्रास्ताविक के.के. महाले, सूत्रसंचालन सुनील वानखेडे, शशिकांत निकम यांनी केले.
सरदार पटेल प्राथमिक शाळा
सरदार पटेल प्राथमिक शाळेत नवागतांचे स्वागत करण्यात आले.अध्यक्षस्थानी संस्थाचालक रमण पाटील होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सीता चौरे व प्रमुख पाहुणे अजय चौधरी उपस्थित होते. मोनिका सोनार, विमल मंडलिक, नीलोफरबानो शेख, तरन्नूम शेख, मुजाहिद शेख यांचाही सत्कार करण्यात आला.
डॉ. काणे विद्यामंदिर शाळा
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी हा तणावमुक्त व भयमुक्त राहावा यासाठी डॉ.काणे विद्यामंदिर शाळेमध्ये ढोलताशांच्या गजरात व फुगे, रांगोळी यांनी सजवलेल्या कारमध्ये बसवून शाळेमार्फत विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख परीक्षित मोडक, प्रशांत पाठक, राहुल पाठक, नरेंद्र सराफ, सुलभा महिरे यांच्यासह शाळेचे शिक्षक घ.रा. बेडसे, पुष्पा चौरे, अमित वसावे, अनिता पाठक, प्रवीण परदेशी, रेखा सूर्यवंशी, प्रकल्प भामरे, नरेंद्र ब्रह्मे, वृषाल पाटील, शुभांगी पाटील तसेच बालमंदिर शाळेच्या शिक्षिका व सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.