आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:विद्यार्थिनीच्या आत्महत्येची सखोल चौकशी करावी

नवापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोंडाईचा येथील शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृहातील सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या वैशाली तापीदास गावित या मुलीच्या आत्महत्येबाबत संपूर्ण चौकशी होऊन बेजबाबदार गृहपाल यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे बाबतचे निवेदन अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेतर्फे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या मार्फत आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना देण्यात आले आहे.

दोंडाईचा येथील शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृहात राहून सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेली नवापूर तालुक्यातील पिंपळे येथील वैशाली तापीदास गावित (वय १९) या मुलीने आत्महत्या केली आहे. याच वसतिगृहामध्ये मागेही एका मुलीने आत्महत्या केली होती. एकंदरीत वैशालीच्या आत्महत्येबाबत शंका निर्माण होत आहे. नेमके आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही; परंतु वसतिगृहामध्ये गृहपाल व इतर कर्मचाऱ्यांचे विद्यार्थिनींकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. वैशालीच्या आत्महत्येमागचे नेमके काय कारण आहे.

त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच तिला न्याय मिळवून देण्यात यावे व आदिवासी विकास विभागामार्फत कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. निवेदनावर अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष आर. सी. गावित, अनिल गावित, विजय गावित, गुलाब गावित, अरविंद गावित, वाशा गावित यांच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...