आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीत चुरशीचे वातावरण:ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेसाठी तालुका प्रशासनाची जय्यत तयारी

नंदुरबार25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार तालुक्यात ७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्याने ग्रामीण भागात प्रचार यंत्रणा जोमात लागली असून प्रशासनाकडूनही तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करण्यात येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच, सदस्य पदाच्या निवडणुकीत चुरशीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

शहादा तालुक्यात ७४ तर नंदुरबार तालुक्यात ७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून १९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नंदुरबार तालुक्यात सरपंचपदाकरिता ३१२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, १ हजार ४४३ सदस्य निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यामुळे सर्वत्र प्रचाराची धामधूम सुरू झाली आहे. यंदा पाऊस चांगले असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. तसेच थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत चुरस दिसून येत आहे. वखार महामंडळमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...