आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे येत्या ७ डिसेंबरपासून दत्त जयंतीनिमित्ताने यात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आढावा बैठक घेत यात्रेची पाहणी केली. श्री दत्त मंदिराच्या प्रांगणात बैठक घेण्यात आली. पी. आर. पाटील यांनी घोडेबाजार, चेतक फेस्टिव्हल चे पटांगण, अश्व शर्यतीसाठी तयार झालेले रेसिंग ट्रॅक, टेंट सिटी तसेच यात्रा परिसराची पाहणी केली. कायदा सुव्यवस्था व पोलीस प्रशासनाने खबरदारी बाळगत काम करावे.
पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. यात्रेत आलेल्या पर्यटकांना कसलीही गैरसीय होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य झल्यास गावातील तरुण मुलांना स्वयंसेवक पोलिस मित्र म्हणून जोडून घ्याव्यात व यात्रा सुरळीत पार पाडावी. यात्रेत कायदा सुव्यस्थेची अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे सांगितले. जयपालसिंह रावल यांनी चेतक महोत्सवामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. या वेळी तहसीलदार मिलिंद कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, दत्त मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष अंबालाल पाटील, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, सचिव भिक्कन पाटील, ट्रस्टी रमेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे, जिल्हा विशेष शाखा पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलिस निरीक्षक एस. एन. कोळी, पोलीस निरीक्षक योगेश कोळी, मंडळ अधिकारी जुबेर पठाण, तलाठी एस.एन. डिगराळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा, डॉ. किशोर पाटील, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.