आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅसेंजर:सुरत-भुसावळ पॅसेंजर उद्यापासून सुरू होणार ; सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम रेल्वेने कोरोनामुऊा गेल्या अडीच वर्षांपासून बंद केलेली रात्रीची सुरत-भुसावळ पॅसेंजर गाडी ८ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी सुरू होत असल्याने खान्देशातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह चाकरमानी व सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. गाडी क्रमांक १९००५ सुरत-भुसावळ पॅसेंजर ही गाडी ८ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटेन, तर दुसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी ७.५५ वाजता भुसावळ स्थानकात पोहोचणार आहे. तर गाडी क्रमांक १९००६ भुसावळ-सुरत पॅसेंजर ९ जूनपासून सायंकाळी ७.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटेल.

{गाडी क्रमांक १९००५ ही गाडी ८ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटेल. त्यानंतर उधना ११.२०, बारडोली ११.५८, व्यारा मध्यरात्री १२.३१, नंदुरबार २.४०, दोंडाईचा ३.३०, शिंदखेडा ३.५९, नरडाणा ४.१८, अमळनेर ५.३, धरणगाव ५.४७, पाळधी ६.४०, जळगाव ७.१०.

{गाडी क्रमांक १९००६ ही गाडी ९ जूनपासून सायंकाळी ७.३५ वाजता भुसावळ स्थानकातून सुटेन. त्यानंतर जळगाव येथे रात्री ८.१०, पाळधी ८.३०, धरणगाव ८.५९, अमळनेर ९.३३, नरडाणा १०.१६, शिंदखेडा १०.५०, दोंडाईचा ११.१८, नंदुरबार १२.२५.

बातम्या आणखी आहेत...