आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा नोंद:तलवार बाळगणाऱ्यास शहाद्यात केली अटक

शहादा3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जुनी भाजी मंडई परिसरात पाटाजवळ तलवार बाळगल्याप्रकरणी एकास अटक करून तलवार ताब्यात घेतली.पोलिस निरीक्षक अंसाराम आगरकर व कर्मचाऱ्यांचे पथक बुधवारी रात्री शहरात गस्तीवर असताना पहाटे अडीच वाजता शहरातील जुनी भाजी मंडई परिसरात बादल भजन पाडवी (वय १९ वर्षे रा. जुनी भाजी मंडई जवळ पाट किनारी शहादा) हा युवक संशयास्पद परिस्थितीत आढळून आला.

त्याची झडती घेतली असता लोखंडी तलवार मिळून आली. तलवार त्याने कोठून आणली व काय करणार होता, याबाबत त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्याला अटक केली. पोलिस शिपाई दिनकर रामा चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...