आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:प्रकल्प अधिकाऱ्यांवर कारवाई‎ करा; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी‎

धडगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा येथील प्रकल्प अधिकारी मंदार‎ पत्की यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत ‎आमलाड येथील आदिवासी‎ मुला-मुलींच्या वसतिगृहात झालेल्या ‎प्रकारासंदर्भात भारतीय ट्रायबल टायगर‎ सेना आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी‎ व तळोदा तहसीलदार यांना निवेदन देऊन ‎ संबंधित प्रकल्प अधिकारी व सहकारी ‎ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. २७ जानेवारी रोजी‎ ही घटना घडल्याचे नमूद केले आहे.‎ संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी मुलींच्या‎ वसतिगृहातही अधीक्षिका यांना सोबत‎ घेऊन रूममध्ये जात मुलांना मारहाण‎ केली. त्याच पद्धतीने विद्यार्थिनींनाही‎ मारहाण केल्याचा आरोप संघटनेने केला‎ आहे.

तर हा झालेला प्रकार वसतिगृहातील‎ एका विद्यार्थिनीने आपल्या पालकांना‎ सांगितल्याचे अधीक्षिका यांच्या लक्षात‎ आल्याने दुसऱ्या मुलींच्या मदतीने तिला‎ मारहाण करत जखमी केले. या मुलीवर‎ तळाेदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू‎ आहे, असे निवेदनात म्हटले आहे.‎ संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांसह मुलींच्या‎ वसतिगृहातील अधीक्षिका यांच्यावरही‎ कारवाई करावी, अन्यथा १० फेब्रुवारी रोजी‎ संघटनेच्या वतीने जन आंदोलन‎ पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...