आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहादासह जिल्ह्यात मकरसंक्रांत सणानिमित्त पतंग उडवण्याची प्रथा आहेत. परंतु या वेळी नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याने त्याचा नागरिक आणि पक्षांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा नायलॉन मांजा उत्पादन, साठवणूक, विक्री व मांजा बाळगणे विरोधात जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी वन्यजीव संरक्षण समितीने जिल्हाधिकारी व एसपींना निवेदन देऊन केली आहे. मकरसंक्रातीच्या दिवशी पतंग उडवण्यासाठी पक्षी- पशु व मानवताच्या जीवताला घातक असलेला चायनीज नायलॉन मांजा वापरला जात असतो. पशु-पक्षी व मानव यात जखमी होतात, त्यात पक्षांच्या मानेला, पंखांना, तसेच पशुच्या व मानवाच्या विविध अवयवांवर या मांजाच्या स्पर्श झाला तर त्या ठिकाणी त्वचा कापली जाते. डोळ्याला इजा होऊन डोळा निकामी होणे, एवढेच नाही तर काही ठिकाणी मानेच्या जवळच्या रक्तवाहिन्या कापल्या गेल्याने काहींना जीव गमावा लागला आहे. त्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
जिल्हा प्रशासनाला निवेदन देताना वन्यजीव संस्थेचे पूनम भावसार व संजय वानखेडे आदी. तुरुंगवास अन् दंडाचीही तरतूद दिल्ली सरकारने जानेवारी २०१७ मध्ये पतंग उडवण्यासाठी चायनीज मांजा आणि इतर हानिकारक धाग्यांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्याचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, त्याच धर्तीवर जिल्ह्यात कारवाई करावी. संजय वानखेडे, वन्यजीव संरक्षण संस्था, नंदुरबार
प्रशासनाने कडक कारवाई करणे अपेक्षित कोणत्याही ठिकाणी चायना मांजा किंवा सिंथेटिक मांजा विक्री करण्यापासून रोखण्याबाबतचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. या आदेशानुसार मांजा विक्री आणि वापर रोखण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि पोलिस प्रशासन यांच्यावर आहे. त्या दृष्टीने कारवाई होण्याची अपेक्षा आहे. पूनम भावसार, नंदुरबार
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार संपूर्ण बंदी घाला विक्रेत्यांनी बैठक घेऊन निर्देश द्यावेत मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात चायना मांजा विक्रीसाठी येत असल्याने शहरातील मांजा आणि पतंग विक्रेत्यांची एकत्रित बैठक बोलवून त्यांना होणाऱ्या कारवाई बाबत निर्देश देण्यात यावेत. तसेच राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.