आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:लाचप्रकरणी तलाठ्यास दोन वर्षे कैदेची शिक्षा‎

नंदुरबार‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकुवा तालुक्यातील जमाना‎ येथील तलाठी प्रवीण जनार्दन कर्णे‎ याला शिक्षा ठोठावली. यात एक वर्ष‎ कैद व पाच हजार रुपये दंड, दंड न‎ भरल्यास २ महिने साधी कैद, दुसऱ्या‎ गुन्ह्यात २ वर्ष कैद व पाच हजार रुपये‎ दंड, दंड न भरल्यास २ महिने साधी‎ कैदेची शिक्षा शहादा येथील जिल्हा व‎ अतिरिक्त सत्र न्यायाधीश १ सी एस‎ दातीर यांनी सुनावली.

गदवानी (ता.‎ अक्कलकुवा) शिवारात असलेल्या‎ शेतात असलेले साग, आंबे, चिकू,‎ फणस, नारळ यांची नोंदी होणे कामी‎ अर्ज दिला होता; परंतु सदर झाडांची‎ नोंदणी होणे कामी तलाठी कर्णे याने‎ तीस हजार रुपये लाचेची मागणी‎ करून तडजोडी अंती दहा हजारांची‎ लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ‎ पकडण्यात आले. या प्रकरणी शहादा‎ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१‎ सी. एस. दातीर यांनी ७ जानेवारी रोजी‎ निकाल दिला.‎

बातम्या आणखी आहेत...