आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:तलाठी सजांची पुनर्रचना करावी

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तलाठी सजाची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने करण्यात आली. सहा. जिल्हाधिकारी मीनल करनवालांना निवेदन दिले.शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सजांची पुनर्रचना करण्यात आली असून नवीन सजा वाढ तसेच महसूल मंडळ वाढ मंजूर करण्यात आली आहे; परंतु नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रशासकीय कामकाज, लोकसंख्या जास्त असूनही सजेची पुनर्रचना करण्यात आलेली नाही.

महसूल मंडळाची वाढ होण्यासाठी पुनर्रचनेवर विचार व्हावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना अध्यक्ष झेड. के. गायकवाड, कार्याध्यक्ष बी. एच. बिडगर, उपाध्यक्ष एम. डी. गावित, सचिव एन. बी. मराठे, कोषाध्यक्ष एन. ए. माळी, सल्लागार पी. एल. पाटील, एन. के. राठोड, एस. व्ही. इशी, पी. ए. वसावे, बी. डी. धनगर, ए. एल. पवार आदींसह महिला तलाठी व्ही. पी. काकुळदे, डी. एन. गीते, के. एस. नाईक आदींचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...