आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:तळोदा ‘कृउबास’ची निवडणूक बिनविरोध होणार; पेट्रोल पंप उद्घाटनप्रसंगी उदेसिंग पाडवींचे सूतोवाच

तळोदा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल पंपामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तर यामुळे बाजार समितीच्या वैभवात भर पडली असून, येणारी बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित आहे, असे प्रतिपादन माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केले.

तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंप उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ते म्हणाले की राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी जयंत पाटील यांनी शहादा विधानसभा उमेदवारी राष्ट्रवादी लढण्याचे शब्द दिला आहे. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती सेल्स एरिया ऑफिसर अमित राणे, तहसीलदार गिरीश वखारे, नगराध्यक्ष अजय परदेशी, कृउबा संचालक निखिलकुमार तुरखिया, गौतम जैन, राजेश पाटील, आंबालाल पाटील, धनराज मराठे, संजय पटेल, भरत चौधरी, प्रल्हाद मराठे, विजय सूर्यवंशी, जयसिंग माळी, सुरेश इंद्रजित, प्रा. सुधीर माळी, नगरसेवक सुभाष चौधरी, गौरव वाणी, संचालक बापू कलाल, हेमंत वाणीसह निसार मकराणी, माजी नगरसेवक अरविंद पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष रामराव आघडे, पुरवठा अधिकारी संदीप परदेशी, मुरलीधर सागर, भगवान मगरे, अनुप उदासी, नगरसेवक भास्कर मराठे आदी उपस्थित होते. हितेंद्र क्षत्रिय, भरत चौधरी, संदीप परदेशी यांनी सहकार्य केले. शहर अध्यक्ष योगेश मराठे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...