आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी:तळोदा पालिकेला मिळाला पाच कोटींचा निधी, खासदार डॉ.हिना गावित यांच्या पाठपुराव्याला यश

तळोदा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवीन वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध होणार

शहरातील नवीन वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी नगर विकास विभागाकडून पाच काेटींचा निधी उपलब्ध झाला आहे. यासाठी खासदार डॉ. हीना गावित या राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होत्या. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील नगरसेवक रामानंद ठाकरे व प्रभाग क्रमांक ३ मधील नगरसेविका बेबीबाई पाडवी यांचे पुत्र दीपक पाडवी हेही प्रभागाच्या विकासासाठी खासदार गावित यांच्याकडे निधीची मागणी करत होते. प्रभाग एक व तीनमधील प्रताप नगर, श्रेयस कॉलनी, गोपाळ नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण, भूमिगत गटार,अक्कलकुवा रोडवरील उत्तरेस आमराई फळी खर्डी नदीलगत संरक्षण भिंत बांधकामासाठी हा पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे यांचे संबधित नगरसेवकांनी आभार व्यक्त केले आहेत. या निधीमुळे शहरातील विकास कामांना मोठी मदत होणार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

पालिकेस निधी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध
तळोदा नगर पालिकेच्या नगरसेवकांनी विकास कामासाठी माझ्याकडे निधीच मागणी केली होती. त्या अनुषंगाने हा निधी दिला असून तळोदा नगर पालिकेत भाजपची सत्ता आहे. खासदार म्हणून या शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करणे माझे कर्तव्य आहे. त्या नुसार मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मी पाठपुरावा केला. त्याची दखल घेत त्यांनी हा निधी मंजूर केला आहे. डॉ.हिना गावित, खासदार.

बातम्या आणखी आहेत...