आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:तळोदा, शहादा निवडणुकीस खडसे येणार; दोन्ही नगरपालिकांवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकवण्याचे पदाधिकाऱ्यांच्या भेटीप्रसंगी दिले आश्वासन

तळोदा8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी तळोदा व शहादा शहराचा पालिका निवडणुकीत मी स्वतः येऊन राष्ट्रवादीची धुरा हाती घेणार आहे. दोघे पालिकेत राष्ट्रवादीचाच झेंडा फडकेल, असा विश्वास माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. त्यातच फोनद्वारे देखील एकनाथ खडसे यांनी अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचे या चर्चेमुळे ते भाजपात घरवासी करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर शाहदा व तळोदा येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर येथे जाऊन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन याबाबतचा खुलासा जाणून घेतला.

दरम्यान त्यांनी यावेळी भेटीस आलेल्या नेत्यांना भाजपत जाण्याबाबतचे अफवेचे खंडन केले. कुठल्याही परिस्थितीत आपण राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. खडसे पुढे बोलताना म्हणाले की, मी स्वतः राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरदजी पवार व माझे व्यक्तिगत खाजगी कामासाठी गृहमंत्री यांची भेट घेण्यासाठी त्यांना भ्रणध्वनीद्वारे संपर्क केला होता. मात्र त्यांचा व्यस्त कार्यक्रमा अभावी त्यांची भेट घेता आली नव्हती. भविष्यात पुन्हा एकदा शरद पवार व स्वतः एकनाथ खडसे हे अमित शहा यांना भेटणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले होते. खडसे यांनी पुढे बोलताना सांगितले की, शरद पवार यांनी नेतृत्वात मी राष्ट्रवादी कोठ्यातून विधानसभेचा आमदार झालो आहे.

त्यामुळे अन्य पक्षात जाण्याचा कुठलाच विषयच येत नाही. त्यामुळे सदर सुरू असलेल्या अफेवेवर विश्वास ठेवू नका. मी राष्ट्रवादीत आहे व राष्ट्रवादीतच राहणार आहे. असा खुलासा त्यांनी यावेळी केला. या भेटी दरम्यान माजी आमदार तथा रा.कॉ.पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी, वैद्यकीय सेलचे प्रदेश समन्वयक डॉ. डॉ. तुषार सनसे, धुळ्याचे सुनील नेरकर, शहर अध्यक्ष योगेश मराठे, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी आदी उपस्थित होते.