आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर बर्डीपाडा गावानजीक दोन ट्रकची समोरासमोर धडक होणार असताना एका चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक मातीच्या ढिगाऱ्यात घातला. यामुळे झालेल्या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले. प्रचंड वेगात असल्याने चालकाने मातीचा ढिगास धडक देताच अर्ध्या ट्रक मातीचा ढिगात घुसला. त्यामुळे ट्रकच्या केबिनचा चुराडा झाला.
तर दुसऱ्या एका अपघातात ट्रक व टँकरची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातातही कोणतीही हानी झाली नाही. टँकर चालक गंभीर जखमी झाला.
कोंबडीचे खत घेऊन जाणारा ट्रक मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अपघातग्रस्त झाला. समोरून येणाऱ्या ट्रकला वाचवण्यासाठी दुसऱ्या चालकाने ताब्यातील ट्रक (क्रमांक एमपी ०९ एचजी ०४१०) रस्त्याच्या खाली उतरवून मातीत ढिगास धडक दिल्याने मोठा अनर्थ टळला. ट्रक गुजरातकडे जाताना बर्डीपाडा फाटकाजवळ अपघात झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.