आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:शिक्षक प्रश्नी ढोल बजाव आंदोलन लेखी आश्वासनानंतर तूर्त स्थगित

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नती व नियमित जीवन वेतनासारख्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चेअंती लेखी आश्वासनानंतर ७ नोव्हेंबर रोजी हाेणारे “ढोल बजाव आंदोलन’ प्रशासनाच्या विनंतीनुसार तूर्त स्थगित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी यांनी दिली आहे. शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळासोबत या प्रश्नी सकारात्मक चर्चा होऊन लेखी आश्वासन देण्यात आले. त्यात शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची ११ पदे पदोन्नतीने भरावयाची कार्यवाही सुरू असून ५ डिसेंबरपर्यंत ११ पात्र शिक्षक, उमेदवारांना पदोन्नती आदेश देण्यात येणार आहेत.

पदोन्नती मुख्याध्यापक पदासाठी ७४ शिक्षकांना मुख्याध्यापक पदी २५ डिसेंबरला पदोन्नती देण्यात येणार आहे. त्यानंतर विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. २०८ वरिष्ठ वेतनश्रेणीच्या त्रुटींची पूर्तता केलेले प्रस्ताव प्राप्त असून त्यावर येत्या १५ दिवसांत परिपूर्ण कारवाई करून १० डिसेंबरपर्यंत संबंधित पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहे. वस्तीशाळा निमशिक्षकांचे प्रस्ताव तयार असून लवकरच या महिना अखेरपर्यंत कार्यवाही करून संबंधित पात्र शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहे.

जीपीफ स्लिपसह जिल्ह्यात तीन वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षण सेवकांचा नियमित आदेश लवकरच निर्गमित करण्यात येणार असल्याचे वेळापत्रकासह लेखी आश्वासन शिक्षक परिषदेस दिल्यामुळे शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष चौधरी यांनी ७ रोजी होणारे ढोल बजाव आंदोलन तूर्त स्थगित केले. दरम्यान दिलेल्या नियोजनाप्रमाणे वेळेत प्रलंबित प्रश्न निकाली न निघाल्यास स्थगित ढोल बजाव आंदोलन पुन्हा करण्याचा इशाराही शिक्षक परिषदेतर्फे दिला.

प्रशासनाशी चर्चेत यांचा सहभाग
या चर्चेप्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, सुभाष मारणार, परेश वळवी, दिनेश वळवी व आस्थापनांचे सर्व लिपिक तर शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे, विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल, उपाध्यक्ष राकेश आव्हाड, संपर्कप्रमुख आबा बच्छाव, जिल्हाध्यक्ष चौधरी, जिल्हा नेते देवेंद्र बोरसे, कार्यवाह किरण घरटे, जगदीश पाटील, राहुल वंजारी, जगदीश भागवत, संतोष हेमाडे, नितीन पाटील, शशिकांत राऊत आदी पदाधिकारी उपस्थित असल्याची माहिती जिल्हा प्रसिद्धिप्रमुख मनोज चौधरी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...