आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक ठप्प:चिंचपाडा रेल्वेगेटमध्ये तांत्रिक बिघाड; दोन तास वाहतूक ठप्प

नंदुरबार5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया : नितीन पाटील, नंदुरबार - Divya Marathi
छाया : नितीन पाटील, नंदुरबार

सुरत महामार्गावर नंदुरबार ते नवापूर रस्त्यावरील चिंचपाडा रेल्वेगेेटमध्ये गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता तांत्रिक बिघाड झाला. सायंकाळी साडेसात वाजता गेट उघडल्याने तब्बल दोन तासांनी ते खुले झाले. त्यामुळे नवापूर व नंदुरबारच्या बाजूने ५ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात पुन्हा काही बेशिस्त चालकांची वाहने घुसवल्याने खोळंबा झाला होता.

नागरिकांनी स्वीकारला पर्यायी मार्ग : वाहनांच्या लांबच लांब रांगा असल्याने दुचाकी आणि अन्य कारचालकांनी पर्यायी मार्गाने जाणे पसंत केले. यात नवापूरकडून नवागाव, शेही मार्गे खांडबारा, तर नंदुरबाकडून खांडबारा, विसरवाडी,कोळदा, धनराट व देवळीफळी मार्गे आपली वाहने नवापूरकडे नेली.

उड्डाणपुलाने सुटणार समस्या
चिंचपाडा रेल्वे गेटवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे रेल्वेगेट हे कायमचे बंद होऊन उड्डाणपुलाचा वापर होणार आहे. यामुळे उड्डाणपूल तयार झाल्यावर नियमित येणारी अडचण दूर होऊन वाहनचालकांचा वेळ वाचेल.

बातम्या आणखी आहेत...