आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गदारोळ:13 कोटींच्या कामांची निविदा रद्द; सभेत विरोधकांनी विचारला जाबॉ

नंदुरबार9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्मशानभूमीत लाकूड अन् गोवऱ्या खरेदीसह विविध विषयांना मंजुरी

शहरातील १३ कोटींच्या विकास कामांची निविदा रद्द करण्याच्या कारणावरून विरोधकांनी एकच गदारोळ केला. निविदा का रद्द करण्यात आली, याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागमी करीत सत्ताधारी पक्षाचा फलक झळकावून निषेध केला. त्यामुळे सोमवारी पालिकेची सभा गोंधळातच आटोपण्यात आली. सकाळी ११.४ वाजेच्या सुमारास सुरू झालेली सभा जेमतेम २२ मिनिटे चालली.

पालिकेची सभा अटलबिहारी वाजपेयी सभागृहात प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे यांच्या उपस्थितीत पार पडली. या वेळी पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, परवेज खान, गजेंद्र शिंपी, हर्षवर्धन रघूवंशी, किरण रघुवंशी, भाजपा विरोधी पक्ष नेता चारूदत्त कळवणकर, प्रशांत चौधरी आदींसह मान्यवर उपस्थित होते. अनुंकपाची ज्येष्ठतेनुसार भरती अनुकंपाव्दारे भरतीच्या संदर्भात मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी सविस्तर माहिती दिली.

न्यायप्रविष्टमुळे खुलाशास नकार
१३ कोटींच्या विकास कामांची निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे कारण काय, याचा खुलासा करावा, असा सवाल भाजपचे चारूदत्त कळवणकर यांनी केला. या वेळी एकच गोंधळ उडाला. यावर मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी सांगितले, की न्यायप्रविष्ट असलेल्या या प्रकरणाबाबत मी खुलासा करू शकणार नाही. यानंतर विरोधक व सत्ताधारी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

सत्ताधाऱ्यांकडूनही कडाडून विरोध
चारूदत्त कळवणकर म्हणाले, एकीकडे विकासाच्या गप्पा मारायच्या तर दुसरीकडे विकास कामांना थांबवायचे ही दुहेरी भूमिका चुकीची आहे. सत्ताधारी पक्षाचे कैलास पाटील, स्वीकृत नगरसेवक गजेंद्र शिंपी, परवेज खान, हर्षवर्धन रघुवंशी यांनी विरोधकांना विरोध करीत विषय मंजूर करण्याची मागणी केली. नवनाथ नगरात एक कोटींच्या कामांनाही यामुळे ब्रेक लागला, अशी भावना विरोधकांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...