आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना शासनातर्फे मानधन दिले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे तालुका व शहरातील ७०० ते ८०० ज्येष्ठ कलावंतांनी मानधनासाठी प्रस्ताव जमा केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी ज्येष्ठ कलावंत मानधन निवड समिती नियुक्त झाली नाही.
ही समिती गठीत करून प्रस्ताव मंजूर करावे या मागणीसाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रालयात निवेदन दिले. या वेळी मंत्री मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मंजूर करण्याचे आश्वासन दिले. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांनाही देण्यात आली.
भाजपच्या व्यापारी आघाडी माजी जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांसाठी मानधन योजना राबवण्यात येते. त्यासाठी प्रस्ताव मागवण्यात येतात. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातून ७०० ते ८०० पेक्षा अधिक ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी मानधनासाठी प्रस्ताव दिले आहेत. पण या प्रस्तावांवर निर्णय मात्र झालेला नाही. कारण प्रस्तावांची छाननी करण्यासाठी समितीच स्थापन झालेली नाही. त्यामुळे सन २०१९-२० मधील २४४, सन २०२०-२१ मधील २५० तर सन २०२१-२२ मधील २०० पेक्षा अधिक प्रस्ताव पडून आहे. त्यामुळे लवकरात लवकर निवड समिती गठीत करुन कलावंतांना मानधन द्यावे, तसेच आलेले अर्ज मंजूर करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.