आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातपुड्याच्या कुशीतील थंड हवेचे ठिकाणी तोरणामाळला जाताना रस्त्याच्या दुतर्फा असेलल्या वृक्षांची पानगळ सुरू झाली आहे. साधारणपणे डिसेंबर अखेरपासून ही पानगळ पाहायला मिळते. जानेवारी आणि फेब्रुवारीत त्याचे प्रमाण भरपूर वाढते सध्या अनेक पर्यटकांची पावले ही तोरणाळच्या दिसेने जात आहे. त्यामुळे राणीपूर ते तोरमाळ या ७ ते ८ किलोमीटरच्या रस्त्यावरील अल्हाददायक वातवणाने मन प्रसन्न होत आहे. त्यात पान गळची ही सळसळ ही विशेष करून पर्यटकांचे मनमोहन घेत आहे.
पानगळ ही वृक्षांच्या जीवनामधली एक अवस्था
पानगळ ही वृक्षांच्या जीवनामधली एक अवस्था असल्याने . तोरणमाळ रस्त्यावर पानगळ होताना दिसत आहे. ही वृक्षांची अवस्था असली तरी हे पानगळ नैसर्गिक अनुभूती देत आहे. म्हणूनच या रस्त्यावरून जाताना एक कविने म्हटल्या प्रमाणे आकाशाची ओढ सरली, उरली धरणीची माया पान पान उतरू आलं, विरळ झाली छाया.. असा अनुभव पर्यटक घेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.