आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:बेपत्ता युवतीचा मृतदेह पुलाखाली आढळला; अत्याचारानंतर खून केल्याचा संशय, तपास सुरु

धडगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरालगत पाच कि.मी. अंतरावरील हरणखुरी व सोमाणा परिसरातील डोंगराळ भागातील पुलाखाली २८ वर्षीय युवतीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. ललिता मोतीराम पाडवी, रा. कुंडलचा गुगलमाल पाडा असे मृत युवतीचे नाव असून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या युवतीशी दुष्कृत्य करून तिचा खून झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

ललिता ही शिरपूर येथे एका खासगी कंपनीत काम करत होती. तिच्यावर अत्याचार झाल्याचा व त्यानंतर डोक्यावर दगडाने ठेचून खून केल्याचा संशय आहे.

शहादामार्गे येत असल्याचे आई-वडिलांना कळवले
शिरपूरहून शहादामार्गे धडगाव येथे येत असल्याचे ललिताने फोनद्वारे आई-वडिलांना सांगितले. सायंकाळनंतर मात्र तिचा मोबाइल बंद येत होता. दोन दिवसांपासून बेपत्ता मुलीचा शोध आई-वडील घेत होते. दरम्यान बुधवारी ललिताचा मृतदेह आढळला. धडगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ५०० मीटर अंतरावर आधी ब‌ॅग, कागदपत्रे व इतर साहित्य आढळले. तेथे शोध घेतला असता मृतदेह आढळला.

बातम्या आणखी आहेत...