आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:टायर फुटून कार उलटली, शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक जागीच ठार; शाळेतून परत येत असताना काळाची झडप

शहादा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धडगाव येथील शाळा सुटल्यानंतर घरी शहाद्याकडे येत असतांना शिक्षकांच्या कारचे टायर फटल्याने झालेल्या अपघातात एक शिक्षक ठार तर चौघे जखमी झाल्याची घटना शहाद्यानजीक बुधवारी (दि.१५) सायंकाळी पाच वाजता घडली.

शिक्षक शांतीलाल बुधा सूर्यवंशी (वय ४७, रा. गांधी नगर, शहादा) यांचा मृत्यू झाला. तर शितल राणे, प्राध्यापक शरद पाटील, नरेंद्र गिरासे, रुपेश कुमार पाटील (सर्व रा. शहादा) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर डोंगरगाव रस्त्यावरील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने रहदारी ठप्प अपघातात कारचा चक्काचूर झाला असून अपघाताचे वृत्त कळताच शहरातील जखमींच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. पेट्रोल पंपाजवळ असलेल्या नागरिकांनी व विद्याविहार कॉलनीतील नागरिकांनी जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.त्यां ना लागलीच शहादा येथील हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. शांतीलाल बुधा सूर्यवंशी यांनी डॉक्टरांनी मृत घोषित केले.

स्वामिनारायण मंदिरासमोर कारचे पुढील टायर फुटले
शहादा येथील रहिवासी असलेले पाच शिक्षक धडगाव येथे नोकरीस आहेत. हे सर्व शिक्षक रोज कारने ये -जा करत. शाळा सुटल्यानंतर परत येत असताना शहाद्यापासून ७ कि.मी. अंतरावर लोणखेडा महाविद्यालयाच्या पुढील वळण रस्त्यावर स्वामीनारायण मंदिराच्या समोर अचानक कारचे पुढील टायर फुटले. त्यामुळे चालकाचा ताबा सुटूनकार रस्त्यालगत खड्ड्यात पलटी झाली. तीन पलट्या मारल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...