आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:तळोद्यात हरकतींवर सुनावणीसाठी नेमलेली समितीच बरखास्त करावी

तळोदा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा शहर विकास आराखड्याच्या हरकतींवर ५ रोजी सुनावणी होणार आहे. नियुक्ती समितीवर शेतकऱ्यांनी आक्षेप घेत ती रद्द करून नवीन सदस्य नेमणूक करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.या बाबत आमदार राजेश पाडवी यांचच्या उपस्थितीत चर्चा होऊन तहसीलदार, पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही निवेदन दिले.

समिती सदस्य हे निवृत्त असून कार्यरत कोणत्याही सक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच मुख्याधिकारी यांना देखील समितीत स्थान दिलेले नाही. इतर स्थायी समितीच्या सभापतींनाऐवजी समितीत अनावश्यकपणे महिला व बालकल्याण सभापतींना का स्थान देण्यात आले आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर दोन महिन्यांचा विलंबानंतर सुनावणी घेण्यात येत आहे. म्हणून देखील सेवानिवृत अधिकाऱ्यांना समितीतून वगळून ती बरखास्त करून नवीन सक्षम अधिकाऱ्यांची समिती गठीत करावी. अन्यथा जन आंदोलनाचा इशारा पुष्पाबाई महाजन, रामचंद्र मोरे, राजेंद्र मोरे, पुंडलिक भोई, लक्ष्मण माळी, नितीन मगरे, शांताराम माळी, योगेश्वर पंजराळे, हिराबाई पंजराळे, वत्सला बाई मगरे, सुरज सूर्यवंशी, उर्मिलाबाई देवरे, रेखाबाई माळी, पंकज माळी, भारतीबाई माळी, लीलाबाई माळी, राजेश मगरे, सुधीर कर्णकार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...