आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय संस्कृती महान आहे. भगवद गीतेत जीवनाचा सार सांगितला आहे. देश विदेशात भारतीय संस्कृती बाबत आकर्षण वाढत आहे, असे प्रतिपादन इस्कॉनचे लंडन येथील पपू भक्तीविकास स्वामी महाराज यांनी केले. नंदुरबार शहरात १५०० भाविकांच्या उपस्थितीत त्यांचे प्रवचन झाले. या वेळी ते बोलत होते. प्रवचनाच्या या धार्मिक सोहळयाला नंदुरबार इस्कॉनचे प्रमुख माधव शाम सुंदर दास, भद्रसेन दास, जगदिश दास, भक्त सुदर्शन, भक्त दिनेश आदी शिष्यगण उपस्थित होते. भारताला प्राचिन संस्कृतीची परंपरा राहिली आहे. श्रीमद भगवत गीता तर जीवनाचा सार आहे. जीवनातील प्रत्येक समस्यांचे उत्तर म्हणजे भगवद गीतेत आहे. त्यामुळे खुप काही अभ्यास करण्यापेक्षा एकदा भगवद गीता निट समजून घ्या. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले श्लोक पुन्हा एकदा समजून घ्या असे ते म्हणाले. विदेशात भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला जात आहे. प्रवचनानंतर प्रसादाचा लाभ भाविकांना देण्यात आला. इस्कॉनचे शिष्य नंदुरबारमध्ये पाच वर्षापासून सेवा करीत आहेत. पहिल्यांदाच मोठा कार्यक्रम पार पडल्याने भाविकांत चैतन्य पसरले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.