आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:प्रांताधिकारी कार्यालय झाले कार पार्किंग झोन; शहाद्यात कार पार्किंग करून नागरिक गावातील आपले व्यवहार करतात पूर्ण

शहादा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील प्रांत कार्यालयात आवारात ग्रामीण भागातून येणाऱ्या चार चाकी वाहन चालक बिनधास्तपणे वाहन लावून दिवसभर आपले खाजगी काम करीत आहेत. प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात विनापरवानगीने वाहन लावत आहेत. यामुळे हे आवार खासगी वाहनांचे पार्किंग झाल्याचे दिसून येत आहे. तर पोलिस प्रशासनाकडून शहरातील रस्त्यांवर होणाऱ्या कारवाई बरोबर या कार्यालयाच्या आवारात लागणाऱ्या वाहनांवर देखील कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे. शहरातील जुनी तहसील कार्यालय या ठिकाणी शहादा उपविभागीय प्रांताधिकारी कार्यालय गेल्या दोन वर्षापासून कार्यान्वित झालेले आहे. गेल्या दोन वर्षापासून कोविड संसर्गजन्य महामारीमुळे प्रशासकीय व खाजगी व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर मात्र आता सहा महिन्यापासून महाराष्ट्र शासनाने कोविडची निर्बंध हटवल्याने व्यवहार सुरळीत झाले आहे.

शहरातील मध्यभागी नवीन प्रांत कार्यालय सुरू झाले असून या कार्यालयाच्या आवारात मोठी जागा रिकामी आहे. प्रशस्त जागा असल्याने शहरासह ग्रामीण भागातून येणारे काही चार चाकी वाहन चालक प्रांत विभागाच्या विनापरवानगीने आवारात बिनधास्तपणे सकाळपासून सायंकाळपर्यंत आपले वाहन त्याठिकाणी लावत असतात. वेळोवेळी प्रशासकीय वाहन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील वाहन या ठिकाणी येत असतात.

त्यावेळेस अनेक अडचणी निर्माण होत असतात. यासंदर्भात गेल्या महिन्यात अनेकांना सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. तरी देखील अनेक चार चाकी वाहन चालक उपविभागीय कार्यालयाचे आदेशाच्या नियमाचे उल्लंघन करून दिवसभर वाहन लावून बिनधास्त शहरात आपला व्यवहार करीत असतात. ग्रामीण भागातून अनेक सामान्य माणूस उपविभागीय कार्यालयात प्रांत अधिकारी यांना भेटण्यास येत असताना त्यांना वाहनांची वर्दळ देखील रेलचेल असल्याने भेटण्यास त्रासदायक ठरत असते.

पोलिसांनी आणि प्रांताधिकारी कार्यालयाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...