आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत नगरपरिषदेकडून बांधण्यात आलेल्या बेघर निवारा ‘आधार’ इमारतीचे उद्घाटन शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.समाजातील सर्व स्तरातील बेघरांना त्यांच्या हक्काच्या निवारा मिळावा, बेघर व्यक्ती समाजाचा मुख्य प्रवाहात यावा तसेच त्यांची हेळसांड होऊ नये व सोयी-सुविधांपासून कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत नंदुरबार नगर परिषदेकडून साधारणतः एक कोटी रुपये खर्च करून स्व.विलासराव देशमुख ट्रक टर्मिनलच्या मागील बाजूला इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे.
शुक्रवारी सायंकाळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्ष कुणाल वसावे पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक रवींद्र पवार, जगन्नाथ माळी, फारुख मेमन, चेतन वळवी, अभियंता विजय पाटील, नगरपालिका कर्मचारी मानसी मराठे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बेघर निवारा इमारतीत अशा आहेत सुविधा स्वच्छ पाणीपुरवठा, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रूम, चहा, नाश्ता, २ वेळचे जेवण, मनोरंजनासाठी टीव्ही, सहाय्य करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी, निवाऱ्यात वीज, थंड पेयसाठी फ्रीजची व्यवस्था केली आहे. सहाय्य करण्यास स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करणार बेघरांना सहायता मिळावी, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच त्यांना सर्व प्रकारचे तात्काळ मदत मिळावी यासाठी पालिकेकडून स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ८कर्मचारी बेघरांवर देखरेख ठेवतील.
बेघर निवाऱ्यामध्ये ५० व्यक्तींची व्यवस्था बेघर निवाऱ्यामध्ये ५० व्यक्तींची व्यवस्था करण्यात आलेली आहे. इमारत सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असून, कोणत्याही बेसहारा, बेघर व्यक्तींसाठी नागरिकांनी पालिकेत संपर्क साधून निवाऱ्याच्या इमारतीत दाखल करावे. जेणेकरून बेघरांच्या हाल अपेष्टा थांबतील. बेघर, बेसहारा व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. रत्ना रघुवंशी, नगराध्यक्ष
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.