आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे उपोषण सुरूच

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील व्याहूर येथील आदिवासींच्या विसावाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमाेर ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.याबाबत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. तालुक्यातील गावठाण जमिनीवर आदिवासींच्या अंत्ययात्रेच्या वेळेस विसाव्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जागेवर काही वर्षांपासून गावात बळजबरीने कब्जा करून अतिक्रमण केले आहे.

अतिक्रमण केलेल्या व्यक्तीकडून ग्रामस्थांना दमबाजी करण्यात येत आहे. आदिवासी गावठाणांच्या जमिनी हडप केलेल्या जागा तत्काळ मुक्त करण्यात याव्यात व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. कायदेशीर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाच्या इशारा निवेदनातून दिला. दरम्यान या आंदाेलनास विविध आदिवासी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...