आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:गट संसाधन केंद्रातील‎ कर्मचाऱ्यांचेही आंदोलन‎

शहादा‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानधन वाढीसह वैद्यकीय रजा,‎ महिला कर्मचाऱ्यांना रजेला खर्चाचे‎ प्रतीपूर्ती देयक मिळावे आदींसह‎ प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या या‎ मागणीसाठी महाराष्ट्र राज्य गट‎ संसाधन केंद्रातील कंत्राटी‎ कर्मचाऱ्यांनी दिनांक १४ मार्चपासून‎ काम बंद आंदोलन सुरू केले आहे.‎ या बाबत संघटनेच्या मार्फत जिल्हा‎ परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी‎ रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात‎ आले.‎

नंदुरबार जिल्ह्यात पाणी पुरवठा व‎ स्वच्छता विभागातील गट संसाधन‎ केंद्रात गेल्या ११ वर्षांपासून गट‎ समनव्यक व समुह समनव्यक या‎ पदावर कंत्राटी कर्मचारी काम करीत‎ आहे. परंतु सदरचे कर्मचारी हे‎ अतिशय अल्प मानधनात काम‎ करीत आहेत. जिल्ह्यात पाणी व‎ स्वच्छता विभागात तालुकास्तरावर‎ एकुण २२ पदे मंजूर आहेत. परंतु‎ सध्यस्थितीत जिल्ह्यात ९ कर्मचारी‎ काम करीत असून रिक्त‎ कर्मचाऱ्याचा कामाचा अतिरिक्त‎ भारही या कर्मचाऱ्यांवर पडत आहे.‎ यापूर्वी महाराष्ट्र राज्य गट संसाधन‎ केंद्रातील कंत्राटी कर्मचारी यांनी सन‎ २०१९ मध्ये काम बंद आंदोलन‎ करून तीव्र आंदोलन केले होते.‎ मात्र चार वर्ष उलटून मागण्या पूर्ण‎ झाल्या नाहीत, त्यामुळे आंदोलन‎ करीत असल्याचे निवेदनात म्हटले‎ आहे. या वेळी संघटनेचे राज्य‎ सचिव जयंत वर्मा, जिल्हा अध्यक्ष‎ अनिल कोळी, जिल्हा सचिव‎ यशवंत गांगुर्डे, सखाराम पवार,‎ वसंत वसावे, अरुण शेंडे, शांताराम‎ वळवी, विजयसिंग वळवी, दातक्या‎ पाडवी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...