आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:नव्या पाइपलाइनमुळे 6 हजार नागरिकांची हाेणार सुविधा

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपरिषदेच्यावतीने १५ व्या वित्त आयोगातून तळोदा रस्त्यावरील हनुमंत पेट्रोल पंप समोरील डीपी रस्त्यापासून ते श्रीराम नगर पर्यंत पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.पाईपलाईन टाकल्यामुळे श्रीराम नगर,नमस्कार कॉलनी व एम.के नगरातील साधारण ५ ते ६ हजार रहिवाशांना पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष कुणाला वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक परवेज खान, रवींद्र पवार, जगन्नाथ माळी, शत्रुघ्न बालाणी, फारुख मेमन, चेतन वळवी, अतुल पाटील, नागरिक उपस्थित हाेते.

कमी दाबाने पाण्याची समस्या दूर
नगरपरिषदेच्या माध्यमातून १५ व्या वित्त आयोगातून अनेक विकास कामे करण्यात आली आहेत. नंदुरबार शहरातील श्रीराम नगर, नमस्कार कॉलनी, सेवकराम नगर व एम.के नगरात कमी दाबाच्या पाणीपुरवठा व्हायचा. त्यामुळे उपाययोजनांच्या सूचना दिल्या. त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यात विषय समाविष्ट केला. सभेत विषयाला मंजुरी देण्यात आली होती.-रत्ना रघुवंशी, नगराध्यक्षा.

बातम्या आणखी आहेत...