आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खान्देशात महिलांनी चालवलेली एकमेव सहकारी बँक; इंदिरा महिला बँकेचा बँको ब्लू रिबनने गौरव

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देशात महिलांनी चालवलेल्या एकमेव इंदिरा महिला सहकारी बँकेला बँको कोल्हापूर आणि गॅलेक्सी इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बँको ब्लू रिबन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा पुणे यांच्या विद्यमाने इंदिरा महिला सहकारी बँकेला २०२१ चा बँकोब्लू रिबन पुरस्कार महिला विभागातून १ ते १०० कोटी ठेवी असणाऱ्या महिला बँक विभागातून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला.

लोणावळा येथील हॉटेल रेडिसेन ब्लू रिसॉर्टमध्ये आयोजित पुरस्कार वितरण सोहळा नुकताच झाला. या वेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डी. जी. काळे यांच्या हस्ते इंदिरा महिला सहकारी बँकेला बँको ब्लू रिबन पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळकृष्ण वाणी यांनी सदर पुरस्कार स्वीकारला. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासीबहुल क्षेत्रातील इंदिरा महिला सहकारी बँक एकमेव महिला बँक असून, ग्राहकांना समाधानकारक सुविधा देण्यात अग्रेसर आहे.

बँकेच्या मार्च अखेर एकूण ठेवी ५५.३९ कोटी रुपये असून कर्ज वाटप ३९.६४ कोटी रुपये आहे. समाजातील गरजू आणि सर्व प्रकारच्या ग्राहकांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज वाटप करून त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी बँकेचा सिंहाचा वाटा आहे. बँकेस मार्च अखेर निव्वळ नफा १०८.२९लाख इतका झालेला आहे. बँकेस पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेच्या चेअरमन कविता मनोज रघुवंशी, व्हाइस चेअरमन ज्योतीदेवी संजय अग्रवाल आणि सर्व संचालक मंडळासह कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बँकेच्या पारदर्शक कारभारामुळे व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.

बातम्या आणखी आहेत...