आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक:मिरवणुकीत बँडच्या तालावर पोलिसही थिरकले

नंदुरबार18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवात बाप्पाची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर पोलिस विभागातर्फे रविवारी मोठ्या उत्साहात श्रींची विसर्जन मिरवणूक काढली. मात्र त्यात ना गुलालाचा वापर करण्यात आला ना कर्कश आवाज वाजला. सर्व पोलिसांनी मात्र पांढऱ्या रंगाचे कुडते परिधान केले. महिला पोलिसांनीही मिरवणुकीत सहभाग घेतला. पोलिस बँड पथकाने ‘अरे दिवानो, मुझे पहचानो’ या गाण्याची धून लावताच त्या तालावर पोलिस चांगलेच थिरकले. त्यात जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर. पाटीलही मागे राहिले नाहीत. त्यांनी निळा कुर्ता परिधान केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत हाेते.

शहर पोलिसांच्या वतीने आयोजित श्रींच्या विसर्जन मिरवणुकीत पोलिस अधीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, राहुल पवार, प्रवीण पाटील, दीपक बुधवंत, पोलिस निरीक्षक दिनेश भदाने, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील नंदवाळकर, महिला पोलिस सेलच्या नयना देवरे व पोलिस कर्मचाऱ्यांनी नृत्य करत उत्साह द्विगुणीत केला. कुठल्याही कामाचा तणाव नाही, आदेश नाही, तपास नाही. एक परिवार म्हणून अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले हाेते.

अरे दिवानाे..ची धून वाजताच पाेलिसांचे अधीक्षकांना खांद्यावर घेत नृत्य
पोलिस बँड पथकाने अरे दिवानो, मुझे पहचानो... मैं हू कौन, या गाण्याची धून वाजवणे सुरू करताच जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांना खांद्यावर उचलून घेत पोलिस नाचले. पोलिसांना नंदूरबारकरानी सन्मान दिला. अनेक भागात बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना आरतीचा सन्मान देण्यात आला. मात्र पोलिसांच्या हक्काच्या बाप्पाला निरोप देताना पोलिस कमालीचे आनंदात दिसले. पोलिस असूनही कुणी खाकी वर्दीत नव्हता, हेच या मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते.

बातम्या आणखी आहेत...