आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाचे केवळ पूजन नाही जतनही:आदिवासी जीवनपद्धतीत निसर्ग वाचवण्याची ताकद, तीन राज्यांच्या महापंचायतीत उमटला सूर

नंदुरबार22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रकृतिपूजक आदिवासी बांधव प्रकृतीचे केवळ पूजनच करत नाहीत, तर वर्षानुवर्षे तिचे जतनही करत आला आहे. नैसर्गिक साधनांचा उपभोग घेणारा, परंतु निसर्गाला किंचितही धोका न पोहोचवणारा आदिवासी जल-जंगलाच्या सान्निध्यात आपले जीवनगाणे गाताे. निसर्गाशी एकरूप झालेल्या या समाजाने घरांची बांधणी, वाद्ये व भांडीही पर्यावरणपूरक निर्माण केली. म्हणून या जीवनशैलीत निसर्ग वाचवण्याची ताकद असल्याचा सूर धडगाव तालुक्यातील कुंडल येथे पार पडलेल्या दुसऱ्या सातपुडा आदिवासी महापंचायतीत उमटला.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या तीन राज्यांतील आदिवासींच्या साक्षीने खड्या कोंडलच्या पवित्र भूमीत ही महापंचायत पार पडली. या पंचायतीत आदिवासी एकता परिषदेचे महासचिव अशोक चौधरी, प्रदेश सचिव डोंगर बागूल, आदिवासी विचारवंत तथा चळवळीतील कार्यकर्ते सांगल्याभाई वळवी, ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनावणे, राजू पांढरा, व्याराचे माजी खासदार अमरसिंग चौधरी, लालसिंग गामीत, गुजरातचे साहित्यिक डॉ. जितेंद्र वसावा, माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...