आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील १७ ग्रामपंचायतीचे मतमोजणी उद्या होणार असून, यासाठी तळोदा राेडवरील तहसील कार्यालयात मतमोजणीसाठी ९ टेबल सज्ज करण्यात आले आहेत. १७ सरपंच पदासाठी ४७ तर १७ ग्रामपंचायतीसाठी ३१८ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. त्यांचा फैसला मंगळवारी होणार आहे. सर्व निकाल दुपारी १२.४० पर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.
सकाळी १० वाजेला मतमोजणीला प्रारंभ होणार असून, दुपारी १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत सर्व मतमोजणी पूर्ण होणार आहे. सुरुवातीला सकाळी १० ते १०.२० वाजेपर्यंत कोठडे, सातूर्खे, खैराळे या तीन ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. १०.२० ते १०.४० वाजेपर्यंत रनाळे या एकाच ग्रामपंचायतीची मतमोजणी होईल. १०.४० ते ११ या वीस मिनिटांत धानोरा, चौपाळे या ग्रामपंचायतीचे मतमोजणी होईल. त्यानंतर २० मिनिटांचा ब्रेक घेण्यात येणार आहे. दुसऱ्या सत्रात सकाळी ११.२० ते ११.४० वाजेपर्यंत ढंढाणे, घोटाणे, करणखेडा या तीन ग्रामपंचायतींचे मतमोजणी होईल.
सकाळी ११.४० ते १२ वाजेदरम्यान रजाळे, तलवाडे, आसाणे या तीन ग्रामपंचायतीची मतमोजणी १२ ते १२.२० तिसी, घुली, राकसवाडे, तसेच १२.२० ते १२.४० ओसर्ली, अमळथे या ग्रामपंचायतींच्या सरपंच, सदस्यांची घोषणा होईल. १७ ग्रामपंचायतींचे निकाल दुपारी १२.४० पर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. १७ सरपंच पदासाठी ४७ तर ३१८ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते.
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार राजेश अमृतकर,नितीन पाटील यांचे सहकार्य लाभले. मतमोजणी होई पर्यंत गिरीविहार परिसरात तळोदा रोडवर मोठी गर्दी राहणे अपेक्षित असून मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. बंदोबस्तातील पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विविध सूचना करण्यात आल्या आहेत.
नवापूर: १५ ग्रामपंचायतींचा तासाभरात लागेल निकाल
नवापूर
तालुक्यातील १५ ग्रामपंचायतचा निकाल २० डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी दोन फेऱ्या प्रशासनाने केल्यास यासाठी आठ व सात टेबल आहे. पहिल्या फेरीमध्ये आठ ग्रामपंचायतींचा समावेश असणार आहे. यात खेकडा, पाटी करंजवेल, वाटवी (करंजवेल), शेही, भांगरपाडा, अंठीपाडा दुसऱ्या फेरीमध्ये सात ग्रामपंचायतचा समावेश असणार आहे.
यात वावडी, बेडकी, वाटवी (खांडबारा) विसरवाडी, खडकी, शेगवे, वऱ्हाडीपाडा १५ ग्रामपंचायतींचा समावेश असणार आहे. एका फेरीला किमान अर्धा तास लागणार असल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली आहे. तहसील कार्यालयात सकाळी १० वाजे सुमारास मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी सरपंच व सदस्य पदाच्या उमेदवारांना मोबाइल मज्जाव करण्यात आला आहे. तासाभरामध्ये संपूर्ण १५ ग्रामपंचायतींचा निकाल घोषित करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.